ब्युरोचिफ प्रशांत शाहा
गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथील समाजकार्याचे शिक्षण घेणारे MSW प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी समाजकार्याचा भाग म्हणून प्रा. डॉ. विवेक गोर्लावार व प्रा. प्रज्ञा वनमाली यांच्या मार्गदर्शनाखाली दि .06.07.2021 ला आलापल्ली गावात तिसऱ्या लाटेतील कोरोना डेल्टा प्लस आजाराबद्दल ची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी या अनुषंगाने कोरोना व्हायरस से बचाव कार्यशर्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात कोरोना बाबत जनता व विद्यार्थ्यांमध्ये जागतृता निर्माण करण्याचा हेतूने समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी अंकुश ब्रम्हदास बोरकर व चद्रंकांत पुंडलिक तिरूनहरीवार यांनी कोरोना वायरस विषयी व्हिडिओ क्लिप द्वारे विस्ततृ मार्गदर्शन केले. तसेच प्रतिबंधात्मक उपायाचीही माहिती देण्यात आली. कोरोना आजाराची लक्षणे सांगुन विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना लस घेण्यासाठी जागृत करण्यात आले. कोरोना आजारासोबतच इतर आजारापासून बचाव व्हावा, विद्यार्थ्यांना लक्षणे उपाययोजनांची माहिती व्हावी यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून आरोग्यदायी सवयी यांची रुजवनुक करण्यात आली. त्यासोबत समुदायातील विद्यार्थ्यांना मास्कचा वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या पालकांना डेल्टा प्लस कोरोना आजार लक्षणे व उपाय योजनांच्या माहिती पत्रकांचे उपस्थितांना वाटप करण्यात आले या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे पालक व ज्येष्ठ नागरिक सुद्धा उपस्थित होत
समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने कोरोना प्रतिबंधनात्मक लसीकरणाबाबत जनजागृती…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements