गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )
दारूबंदी हटवून जिल्यात ठीकठिकाणी प्रत्यक्ष दारू विक्री सुरु झाल्याने मद्यप्रेमी लोकात वेगळाच उत्साह आणि आनंद संचारल्याचे दृष्टिपथास येत आहे.दारूबंदी असतांना दारूसाठी शोधाशोध करावी लागे आणि तीन पट पैसे मोजावे लागत.आता कमी किमतीत सहज दारू उपलब्ध होत असल्याने मद्यपि जाम खुश आहेत.
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सरकारात असतांना चंद्रपूर जिल्ल्यात दारूबंदी करण्यात महत्वाची भूमिका निभावली. तथापि दारूची अधिकृत दुकानें बंद झाली तरी चोरी चोरी छुपके छुपके दारू सर्वत्र उपलब्ध होत होती.पोलिसांनी हजारो कारवाया केल्या.कित्येकांना अटक केली,दारू जप्त केली.दारूविक्रेत्यांना जेल मध्ये धाडले.
तरीही अवैध दारू पूर्णतः बंद होऊ शकली नाही .पोलिसांवर अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली.
सत्तांतर झाल्यावर महाविकास आघाडी सरकारने जिल्यातील जनतेची मतं मागवून रीतसर रीतीने जिल्यातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आणी सर्व प्रक्रियेनंतर आता जिल्यातील बहुतेक दारू दुकानें सुरु झाली आहेत.
आता स्वस्तात सहज दारू उपलब्ध होत असल्याने मद्यपी जमातीत वेगळाच उत्साह आणी आनंद पाहावयास मिळत आहे .आधी तो एका निपसाठी शोधाशोध करून 200रु खर्च करत होता आणी 100त डोंगा फुल्ल ! 100घरी नेणार !
याचमुळे तो आनंदला असणार.
दारू मानसशास्त्रीय पातळीवरचा विषय आहे.मानसशास्त्रीय पातळीवर या विषयाला हाताळावे लागेल ..
दारू दुकानं बंद म्हणजे दारूबंदी असू शकत नाही हे अनेकदा सिद्ध झाले.
Advertisements
चंद्रपुरात दारू सुरु झाल्याने मद्यपीत संचारला उत्साह आणि आनंद !
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements