ब्युरोचिफ प्रशांत शाहा
गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओढकल्या जाणाऱ्या रेगडी गावात व गावातील काही नागरिकांच्या शेतात वृक्षरोपण कार्यक्रम आज पोलीस विभागातर्फे संपन्न झाले.
रेगडी पोलीस मदत केंद्रातील psi शिंब्रे साहेब यांचा नेतृवात हे कार्यक्रम संपन्न झाले. पोलीस कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना व शेतकरी बांधवांना घेऊन हे कार्यक्रम पूर्ण करण्यात आले.
या मध्ये रेगडी येथील काही नागरिकांच्या शेतात व रस्त्या कडेला वृक्षारोपण करण्यात आले व गावातील नागरिकांना वृक्ष लागवड करण्याकरिता रोपटे वाटप करण्यात आले
यावेळी नरेंद्र ढोमने,शकील शेख,नितीन शेरकी,माजी सरपंच बाजीराव गावडे,ग्रामपंचायत सचिव प्रकाश सलामे,त मु अ सुरेश पावे,गुरुदेव कुळमेथे, प्रशांत शाहा,रैनू पोटावी,लालसू पावे व आदी गावकरी उपस्थित होते
पोलीस मदत केंद्र रेगडी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…
RELATED ARTICLES