Homeगडचिरोलीविश्व हिंदू परिषद (बजरंग दल) गडचिरोली तर्फे सेवा-सुरक्षा- संस्कार हे मुख्य उद्देश्य...

विश्व हिंदू परिषद (बजरंग दल) गडचिरोली तर्फे सेवा-सुरक्षा- संस्कार हे मुख्य उद्देश्य ठेवून भोजन वाटप…

नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली- कोरोना काळात सर्वत्र बंद असताना दवाखान्यात भरती असलेल्या पर गावातील रुग्णांच्या नातेवाईकांची खूप फजिती होताना दिसून येत आहे ते पन खास करून शनिवार आणि रविवार जिथे पूर्णपने लोकडाऊनमुळे हॉटेल्स, ऑटोसेवा, खानावळ इत्यादी संपूर्ण बंद आहेत. त्याच विचार करून मागील काही दिवसापासून विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दल गडचिरोली नगर च्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक शनिवार ला महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे भोजनदान, फळे, व मास्क वाटप करण्याचे उपक्रम निस्वार्थपने राबवित आहेत.
संघठन चे मुख्य उद्देश्य सेवा – सुरक्षा – संस्कार हेच आहे आणि त्या साठी आम्ही सदैव तत्पर राहू असे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे, कार्यक्रमच्या वेळेला महिला व बाल रुग्णालायचे मेडिकल ऑफिसर श्री. सोयाम सर व विशेष अतिथी म्हणून गडचिरोली नगर परिषद अध्यक्षा सौ. योगीताताई पिपरे उपस्तीत होत्या. त्यांनी संगठना च्या या उपक्रमाची खूप वाहवाई केली आणि त्यांनी सांगितले की लोकसेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे.
विश्व हिंदू परिषद गडचिरोली नगर अध्यक्ष नितेश खडसे या सर्व कार्यकर्त्यानी सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले तसेच युवक – युवतींना स्वइच्छेने लोकसेवे मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!