गडचिरोली विश्व हिन्दू परिषद बजरंग दल तर्फे हिंदू साम्राज्य दिन साजरा…#शिवाजी महाराजांच्या वीर गाथा व विविध पैलू वर चर्चा…

0
106

नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)

Advertisements

गडचिरोली : – शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरे केले जाते, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गडचिरोली नगर तर्फे हिंदू साम्राज्य दिन सजरा करण्यात आला त्या निमित्याने स्थानिक राम मंदिर निर्माण कार्यालय येथे शिवाजी महाराज यांच्या फोटो ला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलंन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री. गिरीश जी तळवलकर सर उपस्तीत होते, प्रमुख उपस्तिथी श्री रामायण जी खटी, श्री. गजानन जी डोंगरे, श्री. बोरावार सर, श्री. नीलकंठ जी भांडेकर तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे नगर कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. विनय मडावी यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविका सर्वांसमोर मांडली तसेच श्री. गिरीश जी तळवलकर यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा वरती व्याख्यान करताना महाराजांच्या विविध पैलू वरती माहिती दिली, हिंदू साम्राज्य उभा करण्या करता शिवाजी महाराजांनी कसे सर्व लोकांच्या मनात एकनिष्ठेची भावना निर्माण केली त्यामुळेच आज 400 वर्षानंतर सुद्धा हिंदू समाजाचे अस्तित्व टिकुन आहे हे पटवून दिले तसेच आजच्या हिंदू समाजाने, युवकाने जागृत होऊन समाजाला मजबूत करण्याची गरज आहे असे उद्देशून सांगितले. श्री. गजानन जी डोंगरे यांनी शिवाजी महराजांची वीर गाथा गीता म्हणून व्यक्त करून दाखविली.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी कार्यक्रम मध्ये सहभागी सर्व मान्यवरांचे व सभासदांचे अभिनंदन केले आणि आव्हान केले की हिंदू समाजातील सर्व बंधूनी, युवकांनी एकत्र येऊन समजाला जागृत करून सेवा- संस्कार – सुरक्षा हे उद्देश्य समोर ठेवून कार्य करायला पूढे यावे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here