चामोर्शी: तालुक्यातील रेगडी ग्रामपंचायत येथील पाणी पुरवठा योजनेतील विहीरीत मागील दोन ते तीन वर्षांपासून गाळ साचलेले असून रेगडी या गावात पाण्याची भीषण टंचाई सुरू असून या विषयावर रेगडी येथील महिला वर्ग पाण्याची मागणी ग्रामपंचायत मध्ये उपस्थित केले परंतु ग्रामपंचायत सचिव श्री प्रकाश सलामे व माझी सरपंच श्री बाजीराव गावडे यांनि गाळ साफ करण्याकरिता मजदूरांची शोध घेतली परंतु गावातील संपूर्ण नागरिक सध्या शेती कामात गुंतून असल्याने त्यांना मजदूर मिळाले नाही.
ही माहिती समाजसेवक प्रशांत शाहा व आकाश कुळमेथे,अनिल गावडे यांना मिळताच यांनी पाणी पुरवठा विहिरीचे बांधकाम केलेले कंत्राटदार आकाश नैताम यांना बोलावून रेगडी येथील समाजसेव अजय तीम्मा,साईनाथ नरोटे,दिवाकर गावडे,संजय गावडे,दिलीप नरोटे,रवी मंनो,प्रशांत शाहा,आकाश कुळमेथे,अनिल गावडे यांनी सर्वांनी समाजासाठी विहीरीचे गाळ काढण्याचे काम सूर केले असून,विहिरीतील गाळ उपसा करतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून वारंवार विहिरीतील गाळ पाईप मध्ये फसत आहे.वारंवार ते पाईप खोलून गाळ साफ करण्याचे कार्य सुरू आहे.व अवघ्या दोन ते दिन दिवसात हे गाळ साफ करून रेगडी वासीयांना पाण्याची सोय उपलब्ध करून देणार आहेत.