ग्रा.पं.येल्लापूर व जिवती तालुक्यात ठिकठिकाणी “शिवस्वराज्य दिन” साजरा…

381

दिपक साबने-जिवती

जिवती तालुक्यातील येल्लापूर ग्राम पंचायत मध्ये ” शिवराज्याभिषेक ” सोहळा साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे जिवती तालुक्यातील इतर ही ग्रामपंचायत मध्ये ठिकठिकाणी शिवस्वराज्य दिन हा आज ०६ जून २०२१ ला सकाळी ९ वाजता साजरा करण्यात आला.
शासकीय परिपत्रक क्र संकीर्ण-२०/प्र.क्र.१००/आस्था-५ च्या निर्देशानुसार ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये साजरा करायचा होता. सदर कार्यक्रमाचे स्वरूप असे होते की, भगवा ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. ध्वज हा तीन फूट रुंद आणि ६ फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत असावा. शिवचक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीत कमी १५ फूट उंचीचा वासा किंवा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी किमान त्याला ५ ते ६ फुटाचा आधार घ्यावा. तसेच हा दिन साजरा करतांना सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद ,कुंकू, आणि ध्वनिक्षेपक ह्या साहित्यांचा वापर करावा. त्याचप्रमाणे शिवशक राजदंडावर भगवा स्वराज्य ध्वज बांधून घ्यावा. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याच्या सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख, समृद्धी, समता व स्वातंत्राने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा “सुवर्ण कलश” बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करावी. असे शासनाच्या परिपत्रकात नमूद आहे.
ह्या सर्व बाबींचे पालन करून शिव स्वराज्य दिन हा येल्लापूर ग्राम पंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. सरपंच माधव पेंदोर यांच्या हस्ते स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंडाची स्वराज्य गुढी उभारून त्यास नमन करण्यात आले. नंतर सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच माधव कान्हू पेंदोर, कांशीराम पेंदोर, ग्रा.पं. सदस्य, रेखा पेंदोर, ग्रा. पं. सदस्य, स्मिता वऱ्हाडे, ग्रामसेविका , दिपक साबने, संगणक परिचालक, संजीवकुमार चिकटे, ग्राम रोजगार सेवक, उध्दवकुमार जोंधळे, पोलीस पाटील, गंगाधर कांबळे, माजी तंटा मुक्त समिती, येल्लापूर व इतर उपस्थित होते.