आज सकाळच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा अंतर्गत पोलीस मदत केंद्र सावरगाव येथील मोरचूल-बोधनखेडा परिसरात सी 60 पोलीस जवान आणि नक्षवाद्यांची जोरदार चकमक घडून आली आहे.
या चकमकित दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सी 60 जवानानी सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केले असून, दोन नक्षल्यावाद्यांचे मृतदेह मिळाल्याची माहिती आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा मोठा प्रमाणात असल्याने जखमी आणि मृतकांची संख्या जास्त असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. सर्चिंग आपरेशन नंतरच अधिक माहिती प्राप्त होईल. पोलिस सूत्रांनी अध्याप दुजोरा दिला नाही.
धानोरा तालुक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्रा अंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सी 60 च्या जवानांनी सकाळी सात च्या सुमारास सर्चिंग ऑपरेशन सुरू केले. सर्चिंग ऑपरेशन सुरू असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी सी 60 जवानांवर अंधाधुंद गोळीबार केला.
त्याचवेळी सी 60 पोलिस जवानही जशास तसे उत्तर दिले. जवळपास तास भर चाललेल्या धुमश्चक्री सी 60 जवानांचा वाढता दबाव पाहून जंगलाचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला. सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केले असता नक्षलवाद्यांचे दोन मृतदेह मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्चिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती पोलिस विभागा कडून देण्यात येणार असल्याचे समजते.