Homeचंद्रपूरवैद्यकीय पेशातील देवमाणूस डॉ.चेतन खुटेमाटे...कोरोना रुग्णांची पूर्ण फीस केली माफ...तसेच डीपॉझिटही केले...

वैद्यकीय पेशातील देवमाणूस डॉ.चेतन खुटेमाटे…कोरोना रुग्णांची पूर्ण फीस केली माफ…तसेच डीपॉझिटही केले परत…

चंद्रपुर: जिल्ह्यात काल-परवाची गोष्ट एकीकडे देशात एवढी बिकट परिस्थिती असताना देखील केवळ फक्त लालचेसाठी रेमडेसीविर इंजेक्शनच्या काळाबाजारी करणाऱ्या डॉक्टरांना अटक झाली. दुसरी घटना सर्वसामान्य रुग्णाकडून लाखोंचे बिल काढून घेणाऱ्या दवाखान्याचे लायसन्स रद्द करण्यात आले. दोन्हीही घटना वैद्यकीय पेशाला न शोभणाऱ्या आणि निंदनीय आहे.

परंतु हे सारं घडत असताना मागे डॉ. गावतुरे दाम्पत्याने घेतलेला पुढाकार हा नक्कीच प्रशंसनीय आहे. आणि नुकताच डॉ.चेतन खुटेमाटे सर यांनी एका कोविड पेशंटची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण बिलच माफ केले. तसेच दररोज पेशंट व पेशंटच्या नातेवाईकांना शंभर जेवणाचे डब्बे पोहोचवण्याचा उपक्रम डॉक्टर साहेब राबवित आहेत.

आज काही डॉक्टर अक्षरशः रुग्णांना लुटत असताना भयानक चित्र डोळ्यासमोर दिसते. अश्यावेळी डॉक्टर साहेबांनी समाजाबद्दल असलेली तळमळ दाखवून चंद्रपुरकरांचा मान वाढविला. सरांच्या कार्याला इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चा सलाम!

 

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!