ब्रेकिंग! लग्न आटोपून स्वगावी परतत असतांना सुमो उलटली,1 ठार…सिंदेवाही तालुक्यातील घटना…

966

सिंदेवाही: लग्न आटोपूर स्वगावी परतत असतांना टाटा सुमो उलटून अपघात झाला,यात एक जण जागीच ठार झाला.ही घटना मोहाडी-वासेरा मार्गावर घडली.तालुक्यातील नलेश्वर येथे लग्न कार्य आटोपून काही व-्हाडी टाटा सुमोने स्वगावी चिमूर तालुक्यातील वडसी येथे जात होते.या वाहनात 10 प्रवासी बसले होते.

मोडाही-जामसाळा-वासेरा वळण मार्गावर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली.यात वाहनातील एका प्रवाशाला डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले.त्यांना सिंदेवाही ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले.पुढील तपास पोलिस करीत आहे.