एक हाथ मदतीचा या उपक्रमातून आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नाभीक समाज व्यावसायिकांना धान्य किटचे वाटप…

0
246

नागेश इटेकर/ प्रतिनिधी

गोंडपिपरी: लॉकडॉऊन च्या काळात काही छोट्या व्यवसायीकाचे धंदे बंद झाले. पोटपाण्याचा प्रश्न एरणीचा झाला. सदर व्यावसायिकांची प्रतिकूल परिस्थिती लक्ष्यात घेऊन भाजपा तालूका अध्यक्ष श्री. बबन निकोडे व भाजपा कार्याध्यक्ष तथा कोरोना काळात रूगणांच्या मदतीला धाऊन जाणारे साईनाथ मास्टे, राकेश पून भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपुर तसेच माजीनगराध्यक्ष तथा सामजिक दायित्व जोपासणारे संजय झाडे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे छोट्या व्यावसायिकांची व्यथा मांडली या व्यथेला आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गांभीर्याने घेत तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना तात्काळ चंदपूर आपल्या निवासस्थानी बोलावून व्यासायिकांना वाटप करण्याकरिता धान्य किट उपलब्ध करून दिले.

कोरोणाच्या संकटात
एक हात मदतीचा हा धोरण जोपासत गोंडपिपरी शहराच्या नाभीक बांधवाना बबन निकोडे तालूका अध्यक्ष भाजपा गोंडपिपरी व अश्विन कुसनाके भाजपा महामंत्री गोंडपिपरी यांच्या उपस्थीतीत साईनाथ मास्टे भाजपा कार्याध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष संजय झाडे न.पं. गोंडपिपरी, मारोती झाडे भाजपा नेते,गणपतजी चौधरी गुरूजी अध्यक्ष व्यसनमुक्ती संघटना,चेतन गौर माजी उपनगराध्यक्ष तसेच सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या हातांनी मदततीच्या स्वरूपात धान्य किट वाटप करण्यात आल्या.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरीकांना अविरत सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करून माजी पालमंत्री विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून गोंडपीपरी लसीकरण केंद्र, नगर पंचायत कर्मचारी तसेच कोरोना योध्दाना फेसगार्ड व मास्क चे आज वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here