संदीप येनगंटीवर / प्रतिनिधी
जारावंडी: दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावा यासाठी सीआरपीएफ तर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत,त्याचाच एक भाग म्हणून सिव्हीक ऍक्शन प्रोग्राम अंतर्गत 192 सीआरपीएफ बटालियन च्या वतीने जारावंडी येथील आश्रम शाळेत जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली,याचा फायदा परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. परंतु अजूनही स्पर्धा परीक्षेबाबत ग्रामीण भागात आवश्यक प्रमाणात जागृती झाली नाही. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक कोचिंग क्लासेस सुरू आहेत.आणि अनेक ग्रंथालय आहेत परंतु ग्रामीण भागात मात्र याबाबत अद्याप माहिती दिली जात नाही.ग्रामीण भागातही पालक मुलांच्या शिक्षणासाठी जागरूकता दाखवीत आहेत, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनापासून वंचित राहत आहेत.त्यासाठी परिसरातील विध्यार्यांना स्पर्धा परिक्षेबद्ल चांगला ज्ञान मिळावा म्हणून जारावंडी येथे ग्रंथालय स्थापन करण्यात आलं
बटालियनचे कामंडन्ट जियाऊ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जारावंडी चे सहाय्यक कामंडन्ट डॉ, चेतन शेलोटकर यांच्या नेतृत्वाखाली सदर ग्रंथालय स्थापन करण्यात आलं
आजच्या या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी मिळने कठीण झाले आहे त्यामुळे रोजगाराच्या संधी शोधणं गरजेचं आहे अशात तरुणांनी अथक परिश्रम घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावि त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील तरुणांनी या ग्रंथालयाचा उपयोग करावा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. आणि येणाऱ्या काळात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे आणि ते आवश्यक मार्गदर्शन आम्ही देणार आहोत, त्यासाठी सर्वच प्रकारच्या स्पर्धापरीक्षांची पुस्तके कपाटे खुर्च्या टेबल ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे सहाय्यक कामंडन्ट डॉ चेतन शेलोटकर यांनी म्हणाले
सदर कार्यक्रम प्रसंगी जारावंडी ग्रामपंचायतचे सरपंच सौ. सपनाताई कोडापे, उपसरपंच सुधाकर टेकाम, ग्राम पंचायत सदस्य मुकेश कावळे, प्राचार्य व्ही,डी ठवरे, वसतिगृह अधीक्षक एन बी दुधे, ग्रंथपाल राजकुमार मुंजम, तलाठी कमलेश पराते, ग्रामसेवक वसंत पवार, पोलिस निरीक्षक,अभय आष्टेकर, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, उपनिरीक्षक दामोदर काळे, सीआरपीएफ पोलिस निरीक्षक,अमर शेख, उपनिरीक्षक रोशन कुमार आणि जवान उपस्थित होते.