नागेश इटेकर
तालुका प्रतिनिधी
गोंडपिपरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश पुरता हादरून गेला असून सर्वत्र हाहाकार माजला आहे.याआधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वात जास्त शहरात जाणवत होता पन आता हळूहळू गाव खेड्यामध्ये सुद्धा डोके वर काढला असून शहरातच नाही तर खेड्यात सुद्धा या महाभयंकर विषानुने जण जीवन विस्कळीत करून टाकला आहे.
जिल्ह्यातील ईतर गावाप्रमाने गोंडपिपरी तालुक्यात देखील हा विषाणू जलद गतीने पसरला असल्याने समोर गंभीर स्वरूपाचे परिणाम निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपचाराच्या सोयी सुविधांचा अभाव आणि औषोधांचा तुटवडा असल्याने रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे.तर काहींना ईतर ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. रुग्ण दगावण्या चा आकडा दिवसेंदिवस वाढण्याच्या मार्गावर आहे.जनतेवर ओढावलेल्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून आरोग्याच्या दृष्टीकोनातून काही हितोपायोगिक मागण्या जिल्हा परिषद सदस्या सौ.वैष्णवी अमर बोडलावर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.
निवेदनात रुग्णांसाठी १०० नवीन ऑक्सिजन युक्त व्हेंटिलेटर सह बेड पुरविण्यात यावे,ज्या गावात कोरोना संक्रमित रुग्ण आढळले अश्या गावातील संपूर्ण लोकांची चाचणी करण्यात यावी.रुग्णांवर आत्याधूनिक औषोधांचा वापर करण्यात येत नाही तेव्हा रेमडिसिविर सारख्या इंजेक्शनचा वापर करण्या करीता डॉक्टरांना सूचना कराव्यात.Covid-19 लसीचा तुटवडा असून प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात यावे.त्याच प्रमाणे तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत तयार असून तेथे दवाखाना त्वरीत सुरू करण्यात यावे.प्राथमिक आरोग्य केंद्र – तोहोगाव,धाबा तसेच उपकेंद्र – वेळगाव, भंगाराम तळोधी,विठ्ठलवाडा आणि कोविड सेंटर येथे डॉक्टर उपलब्ध करून द्यावे त्याचप्रमाणे आरोग्य सेविकांची पद भर्ती करण्यात यावी. तालुक्यात स्वतंत्र आर.टी.पि.सी.आर.टेस्टिंग लॅब मंजूर करण्यात यावे.
इत्यादी जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत दूर दृष्टिकोन ठेवून मुलभूत आणि हितोपयोगीक मागण्या जिल्हा परिषद सदस्या सौ.वैष्णवी अमर बोडलावर यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत.