रेगडी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर नॉटरिचेबल…#गरोदर महिलेची रुग्णवाहीकेत डिलिव्हरीरेगडी परिसरातील नागरिक छेडणार तीव्र आंदोलन*

0
741

चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात एक नियमित डॉक्टर आहेत मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या काळात सदर डॉक्टर अचानक पणे रुग्णालयातून गायब असल्याने रुग्णांचे मोठे हाल सुरू आहेत.

डॉक्टर नसल्याने आरोग्य केंद्रातील कंपाऊंडर आणि नर्स याच रुग्णांना तपासत असल्याचे दिसत आहे त्यामुळे रेगडी सारख्या दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत आज एक गरोदर महिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र झाले असताना त्याठिकाणी तिला डॉक्टर न मिळाल्याने चामोर्शि कडे जावे लागले मात्र दरम्यानच्या काळात तिची गाडीतच डिलिव्हरी झाली नशीब बलवत्तर म्हणून महिला व बाळ सुखरूप आहे मात्र येथे एक कायमस्वरुपी डॉक्टर असून सुद्धा रुग्णांचे हाल मंत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गरंजी, वेंगणूर ,विकासपल्ली आदि गावातील रुग्ण उपचारासाठी येतात मात्र डॉक्टर नसल्यामुळे उपचाराअभावी रुग्णांना परत जावे लागत आहे. तसेच योग्य औषधेही रुग्णालयात मिळत नसल्यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी वेळ सध्या रेगडीत आहे.
कोरोनाच्या काळात सदर डॉक्टरांना सुट्टी कोणी दिली व दिली असेल तर पर्यायी व्यवस्था का केली नाही असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे.

अश्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाही करून निलंबित करण्यात यावे अशी मांगणी गावकऱ्यांनी केली आहे. रेगडी येथे नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना योग्य उपचार द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here