मे महिन्यातील विवाहसमारंभ टाळा…#तहसिलदार मेश्राम यांचे आवाहन…

0
724
Advertisements

गोंडपिपरी: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढण्यावर आहेत.गोंडपिपरी तालुक्यातही स्थीती गंभीर आहे.मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर लग्न जुळले आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लग्न टाळावेत असे आवाहन गोँडपिपरीचे तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी केले आहे.
कोरोनाला रोकण्यासाठी 15 मे पर्यत शासनाने लाँकडाऊन लावले.अशावेळी कोरोनाला रोकण्यासाठी नियमांचे तंतोतत पालन करणे आवश्यक आहे
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याने परिस्थीती बिकटचा झाली आहे.प्रशासनाकडून यावर आवर घालण्यासाठी ब्रेक द चैन च्या अंतर्गत पंधरा मे पर्यत लाँकडाँऊन वाढविण्यात आलेला आहे.कोरोनाला रोकण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर विवाहाचे मुहुर्त आहेत.गोंडपिपरी तालुक्यातील अनेक कुटुंबिय विवाहाची परवानगी काढण्यासाठी धडपळत आहेत.पण सध्याची स्थीती लक्षात घेता कुटुंबियांनी स्वेच्छेने लग्नसमारंभ टाळावेत.अशा स्थीतीत जर लग्नसमारंभ .कुणी करीत असतील तर केवळ पंचेवीस लौकांच्या उपस्थीतीत अकरा ते एक वाजताच्या दरम्यान त्यांनी विवाह हा
जर नियमांचे उल्लंघन झाले तर पन्नास हजार रूपयाच्या दंडासोबत कडक कार्यवाही करण्यात येणार आहे.
सकाळी सात ते अकरा या वेळेत किराणा,फळांचे दुकान,भाजीपाला,मासमटनाचे दुकान उघडता येतील.अत्यावश्यक सेवा मेडिकल पुर्ण वेळ सूरू असतील.
सध्या बांधकामावर पुर्णत बंदी आहे.यामुळ हार्डवेअर दूकान पुर्णत बःदच ठेवावीत.
कोरोनाच्या या महासंकटाला हरविण्यासाठी आपण सर्वांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.गोःडपिपरी तालुक्यातील नागरिकाःनी,व्यावसायीकांनी नियमांचे काटोकोर पालन करण्याचे आवाहन तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी केले आहे.

कोरोनाला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून नानाविध उपाययोजना करण्यात येत आहेत.पण नागरिकांच्या स्वंयस्फूर्तीच्या अमंलबजावणीची आवश्यकता आहे.मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर विवाहमुहुर्त आहेत अशावेळी या संकटकाळात अतीजबाबदारी न घेता आपली व कुटुंबियांची सुरक्षा लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे.त्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
के.डी.मेश्राम
तहसिलदार गोँडपिपरी

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here