गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षली डोके बाहेर काढले; पाच वाहनांची जाळपोळ…

1734

प्रशांत शहा (विदर्भ ब्युरो चीफ)

अहेरी तालुक्यातील आलापल्ली भामरागड महामार्गावर असलेल्या मेडपल्ली ते तुमीरकसा रस्ता बांधकामावरील 5 वाहनाची रात्री उशिरा जाळपोळ केली. नक्षलवाद्यानी 15 ते 20 च्या संख्येने येऊन कामावरील मजुरांना पिटाळून लावले त्यानंतर नक्षली बॅनर लावून काम बंद करण्याची धमकी देऊन निघून गेले. जाळलेल्या वाहनांमध्ये 3 ट्रोली, 1 लेवल ट्रक्टर व 2 टंकर चा समावेश आहे. उल्लेखनीय आहे की माओवाद्यानी आज 26 एप्रिल रोजी भारत बंदची चेतावणी दिली होती. या पार्श्वभूमीवर रात्री गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे.
मेड्पल्ली ते तुमीरकसा 6 किती अंतराचे रस्ता बांधकामाचे काम छत्तीसगड येथील श्यामल मंडल कंत्राटदार यांच्या द्वारे सुरू होते. रस्त्याच्या बांधकामासाठी मुरूम लागत असल्याने कंत्राटदारानी भाडे तत्वावर जाळपोळीच्या एक दिवसाआधीच ट्रॅक्टर व इतर वाहने बोलावली होती. ती मेडपल्ली गावातच रस्त्यालगत उभी होती. आणि त्याच वाहनाला नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
या रस्ता बांधकामाचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र अचानक रात्री नक्षल येऊन कर्मचाऱ्यांना मारहाण व धमकी देऊन ट्रॅक्टर, पाण्याची टँकर आणि ब्लेड ट्रॅक्टर या वाहनांना आग लावून जाळण्यात आले आहेत. अचानक पुन्हा नक्षल्यांनी डोके वर काढले असुन पुन्हा जाळपोळ केल्याने ग्रामीण परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
समाधान नावाने सरकारने आखलेल्या प्रतिक्रांतीकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या प्रहर दमन अभियानाच्या विरोधात एप्रिल 2021 महिनाभर प्रचार आणि जन आंदोलन उभे करून 26 एप्रिल ला या दमन मोहिमेच्या विरोधात भारत बंद करा अशी हाक बॅनरद्वारे देण्यात आली आहे. याशिवाय नक्षल चळवळीत सहभाग नोंदविण्यासाठी युवक युवतींनो नवजनवादी भारत निर्माण करण्याकरिता पीएलजीआर मध्ये भर्ती व्हा! असे आवाहन करण्यात येऊन पेरमिली एरिया कमेटी, भारताची कम्युनिस्ट पार्टी ( माओवादी ) असे बॅनरमध्ये लिहिण्यात आले आहे.