चिमूर पोलिसांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोह दारू हातभट्टी धाड, 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल..

644

चिमूर:-चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात आज 27 एप्रिल ला पेट्रोलींग करत असताना मुखबीर कडुन खाञीशीर माहिती मिळाली असता नामे सुभाष वाघमारे व आशीष शंभरकर दोन्ही रा. कवडशी असे मिळुन मानुसमारी जंगल परिसरात हातभट्टी मोहादारु काढत आहे. अशी गुप्त माहीती वरुन मानुसमारी जंगल परिसरात लपत छपत जावुन मोहादारु भट्टी कडे गेले असता सुभाष वाघमारे व आशिष शंभरकर हे पोलीसांची चाहुल लागताच जंगलाचे दिशेने पळुण गेले. तसेच मौजा सोनेगाव शिवार उमा नदीचे काठावर दारूबंदी धाड टाकली असता 1) अंदाजे 750 किलो मोहा सडवा किंमत 1,40000 रु. 2) मोहा दारू 160 लिटर किंमत 96,000 रु. 3) गूळ 10 पेट्या किंमत 8,000 रु. 4) हातभट्टीचे साहित्य किंमत 6,600 रु. असा एकूण 2,50,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. घटनास्थळावर 160 लीटर किंमत 96,000 रु मोहासडवा किंमत 1,04000 मोहादारु काढण्याकरिता लोखंडी शेगड्या, लोखंडी/ प्लास्टिक ड्रम, लोखंडी पिपे इ. साहित्य किंमत 24300 असा एकुण 224000 रु मुद्देमाल मिळुन आला. यातील आरोपी सुभाष वाघमारे व आशीष शंभरकर सर्व रा. कवडशी आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून मोहा सडवा, हातभट्टी मोहा दारू असा एकूण 4,74,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपी विरुद्ध रितसर दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हेची नोंद करण्यात आले आहे.
पुढील कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. साळवे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बगाटे सा. पोनि रवींद्र शिंदे साहेब यांचे मार्गदर्शनात Api मंगेश मोहोळ, अंमलदार HC विलास निमगडे, PC सचिन गजभिये, सचिन खामनकर, शैलेश मडावी,तसेच चालक HC शंकर उरकुडे, प्रमोद गुट्टे, प्रविण गोन्नाडे, यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.