गडचिरोली: आज जिल्हयात 63 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10866 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10218 वर पोहचली. तसेच सद्या 535 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 113 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज नवीन दोन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष (चिमूर) व 30 वर्षीय पुरुष (आलापल्ली) यांचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.04 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4. 92 टक्के तर मृत्यू दर 1.04 टक्के झाला.
नवीन 63 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 38, अहेरी 1, आरमोरी 4, भामरागड 02, चामोर्शी 03, धानोरा तालुक्यातील 06, कुरखेडा 02 ,एटापल्ली 3, तर वडसा तालुक्यातील 04 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 56 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 26, अहेरी 08, आरमोरी 04, चामोर्शी 04, भामरागड 5, कोरची 01 तर वडसा मधील 7 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये साई नगर 1, चनकाई नगर 1, बेलगाव 2 , झेपरा 1, गोगाव 2 , चामोर्शी रस्ता 1, मेडिकल कॉलनी 1, सोनापूर कॉम्पलेक्स 1, कॅम्प ऐरीया 2, शाहू नगर 1, नवेगाव 1, पोलीस कॉलनी2, लाझेडा 1, सुभाष वार्ड 3, मेंढा 2, ओम नगर 8, कन्नमवार वार्ड 3, स्थानिक 1 अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये विद्या नगर 2, स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये गुरुनोली 1, स्थानिक 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0 , चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये इलूर आष्टी 1, स्थानिक 2, , धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये चातगाव 1,येरंडी 1, स्थानिक4, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, वडसा तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड 1, विसोरा 2, कस्तुबा वार्ड 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 4 जणांचा समावेश आहे.
Advertisements
गडचिरोली कोरोना ब्रेकिंग! दोन मृत्यूसह आज 63 नवीन कोरोना बाधित तर 56 कोरोनामुक्त…
Advertisements
Recent Comments
Advertisements
Advertisements