Home गडचिरोली उद्यापासून मार्कंडा देवस्थानात करता येणार दर्शन…आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश…

उद्यापासून मार्कंडा देवस्थानात करता येणार दर्शन…आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश…

848

-प्रशांत शहा (विदर्भ ब्युरो चीफ)

गडचिरोली: विदर्भाची काशी असणाऱ्या मार्कंडा देवस्थान उद्यापासून भक्तांसाठी खुले करण्यात येत असून ज्या भाविकांना मार्कंडेश्‍वराचे दर्शन करावयाचे आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने,तहसील कार्यालय , किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील पोलीस चौकीत आपली नोंदणी करून दर्शनासाठी आपले नाव निश्चित करावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी भाविकांना केले आहे.

भगवान मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी गडचिरोली जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून लाखों भाविक महाशिवरात्रीच्या कालावधीत येत असतात. परंतु यावर्षी प्रशासनाने दर्शनासाठी बंदी घातल्याने लाखों भाविकांमध्ये नाराजी पसरली. जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव नसतानाही अकारण मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद करण्यात आल्याने आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्य शासनाचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या आंदोलनाच्या ईशाऱ्याचा सकारात्मक परिणाम होवून मंदीर शनिवार सकाळ पासून दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता भाविकांना भगवान महादेव व मार्कंडेश्र्वराचे दर्शन घेता येणार आहे.

Don`t copy text!