Home गडचिरोली वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख; वाचा कोण होते वीर बाबुराव...

वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख; वाचा कोण होते वीर बाबुराव शेडमाके…

गडचिरोली: महाराज पुल्लेसुर बापु शेडमाके हे गडचिरोली जिल्ह्यातील मोलमपल्ली उर्फ किष्टापुर उपजमीदारीचे जमीदार होते.12 मार्च 1833.ला त्याना पुत्र झाले त्याचे नाव बाबुराव असे ठेवन्यात आले.ज्यानी आपल्या आयुष्याचे 25 वर्ष भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगीरीतुन मुक्त करन्या करीता घालविले व 21आँक्टोबर,1858 ला शहिद झाले. विर बाबुराव यांच्या जन्म दिवसा निमित्त देश वासीयान कडुन विर शहिद बाबुराव जी ना भावपूर्ण विनम्र अभिवादन.
विर बाबुराव शेडमाके यांचे शिक्षण सद्या छत्तीसगड ची राजधानी असलेल्या रायपूर येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले.9 मार्च,1851अदिलाबाद येथील जमीदार मडावी यांच्या राजकुवर हिच्याशी त्यांच लग्न झाले.गडामण्डला येथे 1857 च्या स्वातंत्र्य युध्दात सर्व शक्तीनिशी भाग घेन्या बाबत राजे शंकर यानी सर्व जनजातीय/आदिवासी राज्याची बैठक घेऊन निर्धार केला. या बैठकी नंतर विर बाबुराव शेडमाके यानी चांदागड क्षेत्रात ‘जंगोम’ सेना तयार करून स्वातंत्र्य लढ्याचे कार्य चालू केले.
7 मार्च,1858.ला राजगड येथील इंग्रजानी नियुक्त रामजी गेडाम या जमीदार वर हल्ला चडविला व रामजी गेडाम याना ठार करून त्यांच्या विधवा पत्नीला राजगड जमीदारीचा कारभार दिला.13 मार्च,1858. ला इंग्रजी सैनीकान सोबत नांदगांव(चंद्रपूर जिल्हा) येथे घनघोर युध्द झाले हे युध्द पण विर बाबुराव शेडमाके यांच्या नेत्रुत्वातील सैनिकांनी जिंकले.20 मार्च,1858.ला गढिसुर्ला येथील घनदाट जंगल व डोगंर पहाडात इंग्रजी सैनिक सोबत युध्द झाले हे युध्द देखील विर बाबुराव शेडमाके यांनी जिंकले.या युध्दानंतर अनेक देशभक्ता नी विर बाबुराव सोबत सामील झाले.यात व्यंकटराव शेडमाके, बारीकराव नरसिंहराव,गंगाधर कावटकर,वजीर अली,राजेश्वर मडावी, बांगा मडावी, सिदा विस्तारी,बाळा मडावी, हि-या गेडाम, सोम्या गेडाम, कारुजी कन्नाके, (पिपरी दिक्षित)गाण्या शेडमाके, सिंगाजी पेंदोर,कोंडीबाबा मडावी, असे अनेक सोबत आले.
19 एप्रिल,1858. ला संगणापुर या घनदाट जंगल परीसरात इंग्रजी सैनिका सोबत घनघोर युद्ध झाले व इंग्रजी सैनिक पराभुत झाले.27 एप्रिल,1858. ला इंग्रजी सैनिकांचा दारुगोडा,शस्त्र असलेली आष्टि जवडील छावनी होती त्या छावनी वर हल्ला करुन कँप्टन स्काँट सह अनेक इंग्रजी सैनिकाना ठार करुन इंग्रजाना जबरजस्त धक्का दिला.29 एप्रिल,1858.ला टेलीफोन तार टाकन्याच काम करना-या गड अहेरी या इंग्रजी छावनीवर/कँम्पवर हल्ला केला व कँप्टन हाँल ला कापुन काडले.पीटर गार्टल्ंड जखमी होउन पडुन गेला. 10 मे,1858. ला घोट(ता.चामोर्शी) येथे महादेवाची महापुजा करत असताना इंग्रजी सैनिकानी आक्रमन केला यात घनघोर युध्द झाले गावकरी पण मिडेल त्या साधनाने विर बाबुराव ला सहकार्य केले.
24 जुन,1858.ला भोपालपट्टम येथे महाराणी दुर्गावतीच्या बलीदान दिवस कार्यक्रम ला हजर असताना रात्री झोपेत असताना 50 रोहिल्यानी खाटे सह झोपेतच बांधुन विर बाबुराव ला पकडले यातुनहि विर बाबुराव सुटुन पडाले.15 सप्टेंबर,1858. ला काँप्टन शेक्सपिअर व कँप्टन क्रँक्टन यांच्या नेत्रुत्वात इंग्रजी सैनिक आष्टी(ता.चामोर्शी) परीसरात असलेल्या विर बाबुराव शेडमाके याना पकडन्या करीता फौज निघाली.तारसा आष्टी मधे वैनगंगा नदि आहे पावसाळ्यात डोंग्यानी यावे,जावे लागते.डोंग्यात 10ते 15 सैनीक येउ शकत होते. आष्टी च्या नदि तिरावर विर बाबुराव लपुन बसला होता.इंग्रजी फौज येत आहे याची कल्पना त्यांच्या गुप्तहेरानी दिली होती.जसा डोंगा आला कि विर बाबुराव त्या सैनिकाना कापुन काडायचा अश्या पध्दतीने 700 इंग्रजी सैनिकाना कापुन काडले.
इंग्रजाना हे कडले,इंग्लड पर्यंत हि वार्ता पोहचली, 9 युध्द हारना-या इंग्रजानी विर बाबुराव शेडमाके ला जंगलात व युद्धात जिंकता येनार नाहि याची कल्पना आली. मग हे कार्य इंग्रजांची अहेरी जमीदारी सांभाळना-या लक्ष्मीबाई आत्राम कडे दिली.विर बाबुराव राणी लक्ष्मीबाई आत्राम यांचे अहेरी येथील घरी “विजय तीलक” या करीता येउन जेवन करताना कँप्टन शेक्सपिअर व सैनिक येउन विर बाबुराव शेडमाके यांना 18 सप्टेंबर,1858. ला कपटनीतीने एक सच्छा देशभक्त पकडल्या गेला.
W.H.क्रिक्टन यानी विर बाबुराव शेडमाके यांना फाशीची शिक्षा सुनावली.21 आँक्टोबर,1858.ला 4.30 वाजता चांदा येथील जेल समोरील पिंपडाच्या झाडावर विर बाबुराव शेडमाके याना फाशी देन्यात आले.अवघ्या 25 वर्षात जमीदार ऐष आरामात जिवन जगन्या पेक्षा भारत माते ला गुलामगीरीतुन मुक्त करताना विर बाबुराव शेडमाके शहिद झाले.
12 मार्च या शहिद विर बाबुराव शेडमाके यांच्या जन्म दिवशी विनम्र अभिवादन.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

गडचिरोली पोलीस विभागाकडून परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना जाहीर

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार १९ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे....

गडचिरोली जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) प्रतिनिधी / गडचिरोली : सध्या कोव्हिड-१९ चे रुग्ण जिल्हयात वाढत असल्याने सदर साथरोगावर प्रादुर्भाव व रोखयाम नियंत्रित करण्यास्तव सर्व शासकीय /...

गडचिरोली जिल्ह्यात आज ०३ नव्या कोरोना बधितांची नोंद तर ०३ जण कोरोना मुक्त

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 437 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 03 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपुर श्रमिक पत्रकार भवन में डिजिटल कार्यशाला |

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुर: डिजिटल मीडिया का प्रसार प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया के लिए एक बड़ी चुनौती है। डिजिटल मीडिया वास्तव में क्या...

खेलो इंडिया : क्रीडा सुविधांची माहिती ३० जूनपर्यंत मागविली

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: केंद्र शासनाने " खेलो इंडिया " पोर्टल कार्यान्वीत केले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय/खाजगी शाळा, महाविद्यालय,संस्था,तसेच संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रीडा...

शेतकऱ्यांनो ! पेरणीची घाई करु नका… 80 ते 100 मीमी. पाऊस पडल्यावरच पेरणी करा… कृषी विभागाचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात 13 जूनपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 16 जूनपर्यंत वाशिम तालुक्यातील राजगाव महसुल मंडळात 78.9 मिमी, वारला...

पीसीपीएनडीटी कार्यक्रम: खबरी व्यक्तीला मिळाले १ लाख रुपये बक्षीस रक्कम

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी) वाशिम: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा (पीसीपीएनडीटी) या कार्यक्रमांतर्गत १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम येथील डॉ.सारसकर...

Recent Comments

Don`t copy text!