Home Breaking News येनबोथला येथे महाशिवरात्री दरम्यान देवदर्शनासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू…

येनबोथला येथे महाशिवरात्री दरम्यान देवदर्शनासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू…

1426

प्रतिनिधी गोंडपीपरी
नागेश इटेकर

गोंडपीपरी -तालूक्यातील येनबोथला येथे नदी स्थळी देव-दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते.
अश्यातच आज 11 मार्च रोजी रोहित जोगेश्वर देठे हा युवक आई सोबत एनबोथला येथे आला असता आंघोळी करिता मित्रा सोबत पाण्यात उतरला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली .
महाशिवरात्री दरम्यान तालुक्यातील बरेच भाविक येनबोथला येथे देव दर्शनासाठी गोळा होतात.
कोविळ -19 च्या संसर्गामुळे प्रशासनाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या मार्कंडा (देव) चपराळा, कुलथा या प्रसिद्ध स्थळी महाशिवरात्री दरम्यान जी भव्य यात्रा भरली जाते;तीथे भाविकांची गर्दी होतअसल्याने
सदर ठिकाणी यात्रा भरविण्यास प्रशासनाने मज्जाव केला. त्यामुळे परीसरातील
बरेच भाविक येनबोथला येथील नदीकिनारी वसलेल्या स्थळाची देवदर्शनाकरिता तसेच पूजा अर्चना- करण्याकरिता आले पाहता पाहता सदर ठिकानि भाविकाची तोबा-गर्दी झाली.
गोंडपीपरी येथील रोहित जोगेश्वर देठे वय 16 वर्ष नामक युवक आंघोळी करिता नदीत उतरला होता आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने
पाण्यात बुडून मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली.हजर असलेल्या भाविकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले असून एका स्कारपीओ वाहनात टाकून
ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरीला नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले .

Don`t copy text!