Home चंद्रपूर ब्रम्हपुरी ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहनांच्या धडकेत मेंडकी उपसरपंचाचा मृत्यु…

ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहनांच्या धडकेत मेंडकी उपसरपंचाचा मृत्यु…

809

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी- मेंडकी मार्गावरील रानबोथली गावाजवळ अज्ञात ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाल्याची घटना दि.२६ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घडली.

उत्तम ऋषीजी सोनुले (वय ४०) रा. मेंडकी असे मृतकाचे नाव आहे. उत्तम सोनुले यांची नुकतीच ग्राम पंचायत मेंडकी येथे उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली होती . उत्तम सोनुले यांच्या अपघाती निधनाने मेंडकी गावात शोककळा पसरली आहे.

Don`t copy text!