Home Breaking News मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन यात तृतीय मेरिट आल्याबद्दल माधुरी दीपक कटकोजवार हिचा...

मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन यात तृतीय मेरिट आल्याबद्दल माधुरी दीपक कटकोजवार हिचा गौरव…

399

गडचिरोली गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या सरदार पटेल महाविद्यालयात आज विद्यापीठाच्या गुणवंत यादीत झळकणाऱ्या विद्यार्थांचा गौरव सोहळा आणि पदवी प्रमाणपत्र व पुरस्कार निधी देऊन उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई शांताराम जी पोटदुखे होत्या तर विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांचे सह प्रा.मनीष उत्तरवार ,मंगेश इंदापवार , शामसुंदर धोपटे, माजी कुलगुरू डॉ.किर्तीवर्धन दीक्षित , महाविद्यालयाचे सचिव प्रशांत पोटदुखे , प्राचार्य डॉ.राजेश इंगोले , उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार , प्रा. डॉ. पंकज मोहरीर , प्रा. डॉ. सुनीता बनसोड यांनी प्रामुख्याने उपस्थिती होती. मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन यात तृतीय मेरिट आल्या बद्दल विद्यापीठ व महाविद्यालया कडून माधुरी दीपक कटकोजवार हीचा पदवी सोबत प्रमाणपत्र व पुरस्कार निधी देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

Don`t copy text!