Homeचंद्रपूरसरदार पटेल महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन तथा कविसंमेलन संपन्न...

सरदार पटेल महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन तथा कविसंमेलन संपन्न…

-सुरज दहागावकर (उपसंपादक)
चंद्रपुर- सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपुर येथे कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पि.इंगोले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार, डॉ.पद्मरेखा धनकर, प्रा.सोहम कोल्हे यांची उपस्थिती होती.

डॉ.धनकर मॅडम यांनी आपल्या प्रस्ताविकेतून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा अशी आशा व्यक्त करून कार्यक्रम घेण्यामागील उद्देश उपस्थितांना सांगितला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात इंगोले सरांनी मराठी भाषा ही समृद्ध असून ती अमेरिकेसारख्या देशात शिकवली जाते ही बाब आमच्यासाठी गौरवशाली असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. माधमशेट्टीवार सर यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले.
त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बहारदार कविसंमेलन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरज दहागावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यांत प्रलय मशाखेत्री, श्रुती दुर्गे, राजेश हजारे आणि दीपक सिन्हा यांनी आपल्या सुंदर कविता सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलय मशाखेत्री यांनी केले तर आभार प्रा.कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!