Advertisements
Home चंद्रपूर यवनाश्व गेडकर यांच्या स्मरणातली निरंजना ह्या पुस्तकाचे प्रकाशन...

यवनाश्व गेडकर यांच्या स्मरणातली निरंजना ह्या पुस्तकाचे प्रकाशन…

चंद्रपूर (प्रतिनिधी )-
मानवी जीवनात बरे वाईट अनुभव येतच असतात . त्यातून आपण खूप काही शिकत असतो. त्या जीवनानुभवाचे उत्तम लेखन झाले पाहिजे. साहित्य लेखनातून जीवनाला नवी उर्जा मिळत असते , असे प्रतिपादन पोलिस उप अधिक्षक शेखर देशमुख यांनी येथे केले. नक्षत्राचं देणं काव्यमंच द्वारा आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक यवनाश्व गेडकर यांच्या स्मरणातली निरंजना ह्या पुस्तकाचे प्रकाशन पोलिस उप अधिक्षक शेखर देशमुख यांचे हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते . रमाई जयंती दिनी आयोजित श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते . मिल्ट्री स्कुलचे माजी प्राचार्य तथा पर्यावरण स्तंभलेखक विजय मार्कंडेवार , भाष्यकार प्रा. डाॕ. राज मुसने, जि.प.चे सेवानिवृत्त मुख्य कार्यपालन अधिकारी श्रीधर मालेकर, ग्रंथलेखक यवनाश्व गेडकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्तावनापर मनोगत यवनाश्व गेडकर यांनी केले. स्मरणातली निरंजना ह्या पुस्तकात लेखकांनी व्यक्त केलेली तळमळ लक्षात घेण्यासारखी आहे , त्यात दिवंगत पत्नीविषयीच्या आठवणीचा पूर दिसून येतो, असे मत प्रा.डाॕ. मुसने यांनी व्यक्त केले. ह्या पत्नीविषयक चरित्रात्मक पुस्तकात विरह ,करूणा, प्रेम, समर्पण याचाओलावा ह्या पुस्तकाच्या पानोपानी दिसून येते तसेच सांसरिक अनुबंंध आणि मानसिक साहचर्याचे दर्शन घडते ,असे मत बंडोपंत बोढेकर यांनी केले. याप्रसंगी गणित विषयात गोंडवाना विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या सौ. विद्या अभय घटे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नामदेव गेडकर यांनी केले तर आभार नारायण सहारे यांनी मानले. कार्यक्रमास श्रोते मंडळीत प्रा. श्रावण बानासुरे , रमेश रामटेके , प्राचार्य डोंगे , प्रकाश चांभारे, विलास उगे, सरिता गव्हारे ,देवराव कोंडेकर , मंजुषा खानेकर , अनिल दहागावकर ,धनजंय तावाडे , श्रीकांत प्रतापवार , प्रा. मोरे, डाॕ. धर्मा गांवडे , विजय चिताडे , खंगार पाटील , सौ. हेमश्री मेश्राम आदींची उपस्थिती होती.

Advertisements
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

वनमंत्री चंद्रपूरचे असून सुद्धा शेतकरी भयभीत शेतकऱ्यांना वाचवा :जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले

  चंद्रपूर : संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत आहेत वारंवार अश्या घटना जिल्ह्यात घडत आहेत अजून एक नवीन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील...

भाडेतत्त्व करार वाहनांवर कल्याणकारी मंडळाकडून लाखोंची उधळण चंद्रपूर व गडचिरोली सहाय्यक कामगार आयुक्तालयातील प्रकार

मुन्ना तावाडे (मुख्य सल्लागार) चंद्रपूर: कामगारांच्या न्याय हक्क व संरक्षणाकरिता राज्य शासन अखत्यारीत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्त कार्यालय...

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

वनमंत्री चंद्रपूरचे असून सुद्धा शेतकरी भयभीत शेतकऱ्यांना वाचवा :जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले

  चंद्रपूर : संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत आहेत वारंवार अश्या घटना जिल्ह्यात घडत आहेत अजून एक नवीन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील...

बार्टी तर्फे एकदिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिषद…

- दिनेश मंडपे ( कार्यकारी संपादक) नागपूर: बार्टी, प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिषद आयोजित करण्याचे आदेश दिनांक १९/०४/२०२२ ला मा. महासंचालक श्री....

अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध करा…. सामजिक कार्यकर्ता संजय अलोणे सह गावकऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिका-याकडे केली मागणी..

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) अहेरी - गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात राशन उपलब्ध न झाल्याने राशन कार्ड धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती...

तालुका कृषी अधिकाऱ्यांसह लिपिक अडकला एसीबीच्या जाळ्यात..एसबी पथकाची या आठवड्यातील ही दुसरी कारवाई

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली : राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हॉर्वेस्टर खरेदी केल्याने सबसिडीची रक्कम खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!