पुलवामा हल्यातील शहीद जवानांना रक्तदान करून दिले श्रद्धांजली; धानोरा येथील ११३ बटालियन यांचा उपक्रम…

0
521
Advertisements

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली: ज्यावेळी संपूर्ण विश्व व्हॅलेन्टाईन डे साजरा करीत होता,त्यावेळी जम्मू काश्मीर मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शहीद जवान यांच्या देशा प्रति केलेल्या सर्वोच्छ त्याग व बलिदानाच्या स्मृती पितर्थ्य गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे दिनांक १४/०२/२०२१ ला ११३ बटालियन केंद्रीय रिझर्व्ह पुलिस बल यांच्या कडून कॅम्प परिसरात रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले.रक्तदान पेक्षा जगात मोठे दान नाही हे दान मरणाऱ्या व्यक्तीला जीवदान देते.११३ बटालियन द्वारा हा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शाहीद जवानांना श्रधासुमन अर्पित करण्याचा पर्यास होता.
रक्तदान शिबीर पुलिस उपनिरीक्षक श्री,मानस रंजन(के.री.पु. बल)यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.
या शिबिरात इतर जवानासह श्री,प्रकाश कुरजेकर या जवानानी तब्बल ७६ व्या वेळी रक्तदान करून सर्वांचे उत्साह वाढविले,यांच्या या कार्य करिता ११३ बटालियन कडून त्यांना शाल व श्रीफळ व गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला.
रक्तदान केल्या नंतर सर्वांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला.हे रक्तदान कार्यक्रम धानोरा ग्रामीण रुग्णालय व गडचिरोली रक्त बँकेचे प्रभारी चिकित्सा अधिकारी व त्यांचे सहयोगी सदस्य या सर्वांच्या सहकाऱ्याने संपन्न झाला.या रक्तदान शिबिरामध्ये ११३ बटालियच्या अधिकारी व जवान यांच्या सह ग्रामीण रुग्णालय धानोराचे डॉ. श्री संतोष खोब्रागडे व त्यांचे सहकारी,ब्लड बँकेचे अधिकारी,व धानोरा येथील स्थानिक नाकरिक,पत्रकार वर्ग उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here