चापलवाडा येथे धान खरेदी उपकेन्द्र सुरु करा -आ.डॉ. देवराव होळी यांचेकडे शेतकऱ्यांची मागणी

564

 

गडचिरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा

चामोशी तालुक्यातील चापलवाडा येथे आदीवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी उपकेद्र सुरु करण्यात यावे या मागणीसाठी आमदार डॉ देवराव होळी यांना शेतकऱ्यांनी चापलवाडा येथे बैठकीसाठी पाचांरण करण्यात आले या बैठकीला रेगडी हळदवाही श्रेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या तथा समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडापे,भाजप महामंत्री साईनाथ बुरांडे आदी प्रामुख्याने उपस्थीत होत्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सस्था भाडभिडी धान खरेदी केद्र अतर्गत येणाऱ्या चापलवाडा व परिसरातील गावातील शेतकस्यांना 15 ते 20 किलोमीटर लांब अतंरावरील भाडभिडी खरेदी केन्द्रावर धान विक्री करिता न्यावे लागत असून त्यामुळे शेतकर्याना अधिक आर्थिक बोजा व त्रास सहन करावा लागत असून बैलबंडी व इतर साधनाने लांब अतंरपार करून धान विक्री करण्यासाठी न्यावे लागत आहे मागील दोन वर्षापासून आदिवासी विकास महामंडळ या गंभीर प्रश्नाकडे दुरलर्क्ष करित असल्याच्या आरोप चापलवाड़ा,मच्छली घोट,वरुर,गांधीनगर, शांतीनगर,पोतेपल्ली पॅच,पोतेपल्ली, पलसपूर आदी गावातील शेतकर्यानी केली आहे. यावेळी देवराव होळी म्हणाले शेतकऱ्यांची मागणी रास्त असून आदिवासी विकास महामंडळाने चापलवाडा येथे तात्काळ धान खरेदी उपकेंद्र सुरु करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली आहे