भाजपाचा पदाधिकारी राम लखिया विरोधात उलगुलान संघटनेची तक्रार

0
260
Advertisements

सोशल मीडियावर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान

चंद्रपूर प्रतिनिधी/कैलास दुयाँधन

Advertisements

भाजपाचा पदाधिकारी राम लखिया यांनी व्हाट्सअप च्या श्रीकृष्ण ग्रुप वर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीय द्वेष भावनेतून टीकाटिप्पणी केली. सदर पोस्ट मुळे जातीजातीमध्ये वादविवाद लावणे व जातीय दंगल घडवून आणण्याचा प्रकार करणे असे आढळून आले. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या संपूर्ण समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावलेल्या असून जातीय द्वेष भावनेतून पोस्ट करणारा राम लखिया याच्यावर जाती-जातीत वादविवाद घालने, जातीय दंगल घडवून आणणे या गुन्ह्यात अंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी तक्रार उलगुलान संघटनेच्या वतीने मुल पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली .
संबंधित राम लखिया याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली नाही तर उलगुलान संघटना कायदा हातात घेणार व आपल्या स्टाईलने अपमान करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवणार असा इशारा मुल येथील उलगुलान संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला .
पोलीस निरीक्षक मूल यांना निवेदनासोबत तक्रार देताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, साहिल खोब्रागडे, प्रणय रायपुरे, शुभम दहिवले तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here