निधन वार्ता: माजी आमदार डॉ देवराव होळी यांचे सहाय्यक तुषार सातपुते यांचा अपघाती मृत्यूने चामोर्शी परिसरात शोककळा.
गडचिरोली :०३ सप्टेंबर २०२५
शांत, मृदू व आपुलकीच्या स्वभावामुळे सर्वांच्या मनात घर करून राहिलेले आमचे जिवलग मित्र स्व. तुषार सातपुते (माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे सहाय्यक व सोशल मिडीया प्रमुख) यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकताच मनाला अत्यंत हळहळ व दुःखद वेदना झाल्या.
तुषार हे प्रत्येकाशी भावाप्रमाणे वागणारे, साधेपणा व प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवणारे व्यक्तिमत्त्व होते. माझ्याशी प्रत्येक भेटीत त्यांनी दाखवलेली आपुलकी आजही मनाला स्पर्शून जाते. त्यांच्या अकाली जाण्याने एक उमदा मित्र, एक निष्ठावान कार्यकर्ता व आपुलकीने नाते जपणारा सहकारी हरपला आहे.
या दुःखाच्या प्रसंगी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांना आणि जिवलगांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य लाभो हीच प्रार्थना.
टीम इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कडून भावपूर्ण श्रद्धांजली…
💐💐🙏







