कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांचा आंदोलनाकडे शाशनाचे दूर्लक्ष,तालूक्यातील कर्मचारी मागील १५ दिवसापासून बेमूदत संपावर…

167

प्रतिनिधी सतीश कुसराम
कूरखेडा :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांचा नियमित शाशन सेवेत समायोजन प्रक्रीयेत होणार्या विलंबाचा निषेधार्थ व अन्य काही आपल्या मागण्याकडे शाशनाचे लक्ष वेधण्याकरीता दि.१९ आगस्ट पासून बेमूदत संप पूकारलेला आहे मात्र या आंदोलनाकडे शाशनाचे दूर्लक्ष असल्याने अद्याप तोडगा निघू शकलेला नाही त्यामूळे आरोग्याचा सूविधेपासून सामान्य जनतेला वंचित व्हावे लागत आहे.सार्वजनिक आरोग्य या निकडीचा प्रश्नाबाबद शाशनाची उदासिनता सर्वसामान्याचा मनात चिड निर्माण करीत आहे.तातडीने तोडगा काढत ही समस्या निकाली काढण्यात यावी अशी मागणी कर्मचार्यासह नागरीकाकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १० वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचार्याना दि.१४ मार्च २०२४ च्या शाशन निर्णयाप्रमाणे नियमित शाशन सेवेत समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र दिड वर्षाचा कालावधी होऊनही या निर्णयाची अद्याप अमलबजावणी करण्यात आलेली नाही सदर निर्णयाची तातडीने अमलबजावणी करण्यात यावी तसेच ३ वर्ष व ५ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या अधिकारी कर्मचारी याना लायल्टी बोनस पूर्ववत लागू करण्यात यावा, ईपीएफ व ग्रॅज्युटी योजणा १५ हजार ५०० रू पेक्षा अधिक मानधन असणार्या सर्व कंत्राटी कर्मचार्याना लागू करण्यात यावी यासह कर्मचार्यांचा विविध न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्याकरीता राज्या सह तालूक्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी बेमूदत संप आंदोलन पूकारलेले आहे मात्र सर्व सामान्याचा आरोग्याशी निगडीत या महत्वपूर्ण प्रश्नाकडे असंवेदनशील शाशनाचे दूर्लक्ष होत असल्याने कर्मचार्यासह सर्व सामान्याचा मनात शाशन विरोधात चिड निर्माण होत आहे