पावसाच्या रिपरिपीतही तालुकास्तरीय कलाउत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये आणली रंगत….देसाईगंज गट साधन के़द्राने केले होते आयोजन.

98

प्रतिनिधी सतीश कुसराम

देसाईगंज:-

शारीरिक शिक्षण व साक्षरता विभाग तथा शिक्षण विभागाच्या वतीने,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ‘बारा कलांचा आविष्कार:- कला उत्सव’ स्पर्धेचे आयोजन दि.२९ रोजी गट साधन केंद्र येथे करण्यात आले होते. पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये इयत्ता ९ ते १२ वी च्या विद्यार्ध्यांनी सहभाग घेवून बाराही कला प्रकारात रंगत आणली. सदर कार्यक्रम पाहण्यासाठी गट साधन केंद्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह फुल्ल झाला होता.

या स्पर्धात्मक कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे होते.उद्घाटन गटसमन्वयक एकनाथ पिलारे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून किसान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जगदिश केळझरकर, मुख्याध्यापिका शमीम बानो कुरेशी, डॉ.चंद्रशेखर बांबोळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. विकसीत भारत २०४७ मधील भारताची कल्पना’ असा या स्पर्धेतील आशय होता.यात एकुण १२ कला प्रकाराचा समावेश होता.या सर्व प्रकारात तालुक्यातील एकुण २३ शाळांमधील विद्यार्थ्यां सहभागी झाले होते. एकल गायन या प्रकारात विनायक विद्यालय विसोरा येथील डिंपल नाकाडे,समूह गायन- शिवाजी विद्यालय तुळशी येथील अंजली दुनेदार आणि संच,एकल स्वरवाद्य- युवक विद्यालय विहिरगाव मधील क्रिष्णा दिघोरे, तालवाद्य – म.गांधी विद्यालय देसाईगंज – यश पर्वते,एकल नृत्य -डेव्हीड किर्ती इंग्लीश स्कुल देसाईगंज येथील करीश्मा राऊत, समूह नृत्य मध्ये रेणूकाबाई उके विद्यालय शिवराजपुर येथील सुकन्या कोडापे व संच,दृश्यकला द्विआयामी- कुथे पाटील ज्यु.काॅलेज-सुजल मुद्दलवार,दृश्यकला त्रिआयामी-आदर्श न्यु इंग्लीश हायस्कूल -देविदास पाठक, पारंपारिक गोष्ट/कथाकथन-कृतीका ढोरे जि.प.हायस्कुल कुरुड व लघूनाटीका या कला प्रकारात कृतीका ढोरे यांची अव्वलस्थानी निवड झाली. गुणानुक्रमे प्रथम आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. या बाराही कला प्रकाराच्या स्पर्धांचे परीक्षक व गुणलेखक म्हणून तालुक्यातील वेगवेगळ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना पाचारण करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय साधन व्यक्ती अरविंद घुटके यांनी तर संचालन विष्णू दुनेदार आणि आभारप्रदर्शन लक्ष्मन सुखदेवे यांनी केले.