अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान नुकसान भरपाई आर्थिक मदत करावी व्यापारी आघाडी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अमर बोडलावार यांची मागणी

844

गोंडपिपरी :- तालुक्यातील दिनांक १९ मार्च २०२४ मंगळवार रोजी चार वाजता च्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह गारपीट रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

काढणीला आलेला गहू हा जमीनदोस्त झाला आहे तर ज्वारी हे पीक सुद्धा आडवे झाले आहे. तसेच हरभरा,मका, मिरची, भाजीपाला काही प्रमाणात गहू अशा विविध पिकाचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे तसेच काहीजनांच्या घरांवर विज कोसळल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे आणखीन तीन चार दिवस अवकाळी पाऊस राहील असा हवामान अंदाज वर्तविन्यात आलेला आहे.

मा.अमरभाऊ बोडलावार अध्यक्ष व्यापारी आघाडी चंद्रपूर जिल्हा यांच्या सोबत बाजार समैती सभापति इंद्रपाल धुदसे,संजय वडस्कर माजी प, सदस्य, विनोद गायकवाड माजी उपसरपंच, विलास माशिरकर है उपसतिथ होते.

गोंडपिपरी तहसील कार्यालय येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देताना टिपलेले क्षण.

तरी शासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे