Home गोंडपीपरी वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथील घटना

वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथील घटना

1222

गोंडपिपरी:  तालुक्यातील दरुर येथे ग्रामपंचायत समोर किरमिरी मुख्य मार्गावर गावातील युवक शाहीर अनिल आऊतकर याचा मृतदेह आढळला.शाहीर याचे आई – वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले तो एकटाच असून आजी-आजोबांकडे राहून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मृतदेह असल्याच्या घटनेची माहिती पोलीस पाटलांनी पोलीसांना दिली. दि २२ शुक्रवारी सकाळी ८ वाजता घटनास्थळी प्रभारी ठाणेदार वाघमारे, पिएसआय मनोहर मोगरे, हवालदार शांताराम पाल, मत्ते,सुरपाम दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरित पाठविले आहे.एकीकडे पोलीस अपघात असल्याचे जाहीर करत मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठीविले असून गावात मात्र त्या युवकाची हत्त्या झाल्याची चर्चा आहे. बेदम मारहान करून हत्या करून दुचाकीला बांधून ओढत मृतदेह गावाबाहेर मुख्य मार्गावर नेऊन ठेवल्याची चर्चा जोर धरत आहे. हत्या की अपघात प्रश्न अनुत्तरीत असून पुढील तपास ठाणेदार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. ठाणेदारांशी संपर्क साधला असता पाठीवरील खरचडलेल्या जखमा या फक्त अपघाताच्यास आहे. शरीरावरील जखमां वरून अपघात झाल्याचे निदर्शनास येते अशी माहिती ठाणेदारांनी दिली.

Don`t copy text!