आमदार देवराव भोंगळे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांची घेतली भेट…

609

शरद कुकुडकार तालुका प्रतिनिधी गोडपिपरी

गोंडपिपरी:- तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना काल ( दि.६) ला भेट देऊन गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. माझ्या राजुरा मतदारसंघातून वाहणाऱ्या वर्धा नदीला मागील महिन्यात पुर आल्याने नदी_नाल्याच्या काठावर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा जोरदार तडाखा बसला.

खरिपात मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी उभी केलेली पिके पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेली. त्यामुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटांनी हतबल झाले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी देशपांडे, पानोरा , सुपगांव, सालेझरी, नांदगांव, फूर्टीहेटी, विठ्ठलवाडा, नंदवर्धन, कुलथा व नदी पट्ट्यातील शेकडो हेक्टर शेतीला वर्धा नदीला आलेल्या पुराचा प्रचंड फटका बसला. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात उसनवारी व कर्ज काढून कशीबशी उभी केलेली कापूस, सोयाबीन,तूर ,मिरची,धान तूर,पिके पुरामुळे उध्वस्त झाली. जणुकाही शेतकऱ्यांचे स्वप्नच पुरात वाहून गेले. अशा या अस्मानी संकटांनी शेतकरी पार कोलमडून गेले आहे. पुरामुळे काही शेतात मोठ्या प्रमाणात गाळ साचला तर काही ठिकाणी नदीकाठावर असलेली शेती पुराने खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी व गावातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

यावेळी माझ्यासमवेत भाजपाचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प.सदस्य अमर बोडलावार, निलेश पुलगमकर, निलेश संगमवार,राकेश पुन, भानेश येग्गेवार, सतीश वासमवार, प्रवीण डोढरे, अनिल काबेवार, तिरुपती भुरीवार , दिवाकर पाटेवार,पूरग्रस्त गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.