देहदान करून ढोणे परिवाराने केले मानवतेचे संवर्धन

1079

नागपूर: अंबाझरी नागपूर येथील निवासी तेजराव गोविंदा ढोणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदान-अवयवदान करण्याची इच्छा आपल्या परिवारातील लोकांसमोर खुपदा व्यक्त केली होती.
त्यांची पत्नी प्रमिला ढोणे , मुलगा अजय व अभय यांनी पुढे येत देहदान प्रकीया समजून घेतली. बाबा मरणोत्तर देहरूपाने काही काळ शिल्लक राहून नवोदित डाॅक्टरांच्या कामी येऊ शकतात.
एका देहदानातून पंधरा ते वीस डाॅक्टर तयार होणार असतील तर मानवतेची महान अशी उपासना आपण नक्कीच केली पाहिजे. आपण रूढी परंपरांचे न ऐकता विज्ञानाचे ऐकले पाहीजे असा विवेक निष्ठ विचार ढोणे परिवाराने केला. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे बाबांचे देहदान करून मानवतेचे संवर्धन केले.
यावेळी शरीर रचनाशास्त्र विभागप्रमुख डाॅ.अरूण कासोटे, डाॅ. दीप्ती मॅडम, डाॅ. गोडघाटे, देहदान समिती सदस्य डाॅ.सुशील मेश्राम, डाॅ.अंकुश बुरंगे, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे नागपूर समन्वयक दिनेश मंडपे तसेच ढोणे परिवारातील आप्तस्वकीय प्रामुख्याने उपस्थित होते . आपणही ढोणे परिवाराचा मानुसकीचा वसा कृतिशील होऊन पुढे नेण्यास प्रतिज्ञा बद्ध होऊया…