चंद्रपूर: गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरने तापमानाचा उच्चांक गाठला आहे.
एप्रिलच्या या मध्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. यामुळे आढवड्यापासून चंद्रपूरने तापमानाचा उच्चांक मोठ्या प्रमाणात गाठला आहे. मंगळवारी ४३.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. विदर्भ तथा राज्यामधील हे सर्वाधिक तापमान आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सलग ४३.२ अंश डिग्री तापमानाची नोंद होती. आता तापमानाचा आकडा ४३.२ अंश डिग्री सेल्सिअस पेक्षाही वाढला आहे. मंगळवारला विक्रमी ४३.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. या वाढत्या उष्णामुळे शहरातील नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. दुपारच्या सुमारास बाजारातील रस्ते, शहरातील मुख्य मार्गावर सर्वत्र शुकशुकाट दिसते आहे.