Homeचंद्रपूरसावलीलाच घेताना अडकल्या महिला वनरक्षक पतीच्या माध्यमातून घेतले पैसे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची...

लाच घेताना अडकल्या महिला वनरक्षक पतीच्या माध्यमातून घेतले पैसे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

  1. सावली: अतिक्रमित वनजमिनीवर रोपवन न करण्याच्या कामासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या महिला वनरक्षकास अटक करण्यात आली. त्यांनी आपल्या पतीच्या माध्यमातून लाच स्वीकारली. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार (ता. १७) लाचलुचपत प्रतिबंधकत विभागाने केली.
    तालुक्यातील वनपरिक्षेत्राअंतर्गत व्याहाड खुर्द क्षेत्रातील उपरी येथील वनरक्षक शारदा कुळमेळे यांनी अतिक्रमित वन जमिनीवर रोपवन न करण्याच्या कामासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड करून पाच हजार रुपये देण्याचे तक्रारकर्त्याने मान्य केले. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. ठरल्यानुसार सोमवारी तक्रारदार पाच हजार रुपये घेऊन आला. ही रक्कम महिला वनरक्षकाने आपल्या पतीस देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारतानाच वनरक्षकाच्या पतीस ताब्यात घेतले. ही रक्कम वनरक्षक शारदा कुळमेथे हिच्या सांगण्यावरून घेतल्याचे पतीने सांगितले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पती-पत्नीस अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे, नरेश नन्नावरे, रवी ढेगळे, वैभव घाडगे, पुष्पा काठोडे, सतीश सिडाम यांनी केली.
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!