बळीराम काळे,जिवती
जिवती (ता.प्र):तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मौजा टेकामांडवा शिवारात वीज पडून ज्योती नंदू आईतवाड(३०) व मंजुळाबई अंकुश रूंजे(४५) हे साधारण जखमी झाले.ही घटना दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली.
अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.अशातच मनोहर देवरवाड यांच्या शेताजवल वीज पडली.यात त्यांच्या एक म्हीस व एक वगार अशा दोन म्हशिंचा जागीच मृतयु झाला. अंदाजे ९०,००० ची नुकसान झाली असून त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी.
तसेच ज्योती नंदू आईतवाड(३०) यांना साधारण विजेचा झ्टका बसला व मंजुळाबई अंकुश रूंजे(४५) हे साधारण जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ जखमींना उपचार प्राथमिक उपचार गावातच चालु आहे.त्यांची प्रकृती चिंतजनक नसुन काही जीवीत हानी झाली नाही.