Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्हा होमगार्ड संघटनेच्या वतीने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विविध मागणी संदर्भात...

चंद्रपूर जिल्हा होमगार्ड संघटनेच्या वतीने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विविध मागणी संदर्भात निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)

चंद्रपूर : विनोद गुणशेट्टीवार व अन्य होमगार्ड सैनिक पथक चंद्रपूर यांच्या विविध मागणी संदर्भात नियोजन भवन चंद्रपूर येथे भाऊ मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, मत्स व्यवसाय.
मंत्री यांना निवेदन देण्यात आले.

होमगार्ड संघटनेच्या रास्त मागण्या याप्रमाणे
होमगार्ड सैनिकांना सण, उत्सव, निवडणूक इत्यादिकरीता बोलवण्यात येत असते.परंतु सण उत्सवाचा कालावधी संपुष्टात येताच. त्यांना काम उपलब्ध नसल्यामुळे बेरोजगार राहावे लागते.

यापूर्वी युतीचे सरकार असताना होमगार्ड सैनिकांना 180 दिवसांची कर्तव्य देण्यात आले होते.परंतु मागील शासनाने ते बंद केले असल्यामुळे होमगार्ड सैनिकांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी 180 ते 200 दिवसाचे कर्तव्य देवून मानधन 670 रू.ऐवजी 985 रू.प्रती दिवस करण्याची विनंती केली आहे.

त्यांची मागणी रास्त असून याबाबत शासन स्तरावरून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने योग्य निर्णय घेण्यात यावे असे निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन मार्फत देण्यात आले…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!