Home चंद्रपूर वनपरीक्षेत्र जिवती व शेणगाव यांच्या पुढाकरातून वन्यजीव सप्ताह…वन्य प्राण्यांचे रक्षण हेच,आपल्या मुख्य...

वनपरीक्षेत्र जिवती व शेणगाव यांच्या पुढाकरातून वन्यजीव सप्ताह…वन्य प्राण्यांचे रक्षण हेच,आपल्या मुख्य समृद्धीचे रक्षण…

787

बळीराम काळे,जिवती

जिवती:(ता.प्र.) तालुक्यातील फॉरेषट विभागाच्या वतीने आयोजित वनपरिक्षेत्र जिवती अंतर्गत माराईपाटण येथे आयोजित वन्यजीव सप्ताह च्या मध्यातून गावातील नागरिकांना फॉरेषट विभागाचे अधिकारी क्षेत्र सहायक
ए. डब्लू. राखूंडे साहेब,तसेच वनरक्षक आर.पी.राठोड साहेब, शेणगाव बीट, वनरक्षक यु. व्ही.गोठमुखले नागापूर बीट व इतर कर्मच्यारी यांनी वन्य जीव सप्ताहाचे अवचीत्य साधून माराईपाटण येथील गंगा मातेच्या परिसरातील स्वछता अभियान गावकार्यासह राबविण्यात आले.आणि राखुंडे साहेबांनी गावातील नागरिक मंडळीस मार्गदर्शन केले की,आपण व आपल्या सभवतालच्या परीसर स्वच्छ ठेवला पाहिजे जने करून आपण व आपले कुटुंब निरोगी राहिले पाहिजे.दुर्गंधीमुळे,दुषित वातावरणाने रोगराई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे गावातील प्रत्येक ठिकाण असेल तेथील स्वछत: ही स्वतःची जबाबदारी म्हणून बाळगली पाहिजे,तसेच वन्यजिव यांचे रक्षण करणे हेच आपले ध्येय असले पाहिजेत तरीही, आपण जास्त प्रमाणत जंगल तोड करू नये.कारण, जंगतोडीमुळे आपलेच नुकसान होईल,पाऊस कमी प्रमाणत पडतो आहे.याच कारण,म्हणजे जंगलतोड होत आहे, जेवढे जास्त प्रमाणत आपण जंगल तोड बंद करू तेव्हा कुठेतरी जंगल वाढेल, आणि वन्यप्राणी मात्रास चांगले जीवन जगणे व त्यांना आपले स्वरक्षण करण्यास मदत होईल.
वन्यप्राण्यांचे रक्षण हेच आपल्या मुख्य समृद्धीचे जीवन आत्मज्ञानानं करणे ही फार मोठी काळाची गरज बनली आहे.
फॉरेषट विभागाचे अधिकारी क्षेत्र सहायक डब्लू. राखूंडे साहेब,तसेच वनरक्षक आर.पी.रठोड साहेब, शेणगाव बीट, वनरक्षक यु. व्ही.गोठमुखले नागापूर बीट व इतर कर्मच्यारी गावातील पोलीस पाटील,माझी उपसरपंच, व गावातील तरुण युवा प्रत्तीष्ठित नागरीक ईत्यादिंची उपस्थिती होती.

Don`t copy text!