Home अहेरी स्वराज्य फाउंडेशनच्या मदतीने अपघातग्रस्त व्यक्तीला मिळाली मदत ..

स्वराज्य फाउंडेशनच्या मदतीने अपघातग्रस्त व्यक्तीला मिळाली मदत ..

564

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी :- बिछ्छे हायवा नरोटे ताडगूडा राहते (एटापल्ली)  काल दिनांक २९ ऑगस्ट सायंकाळी ४:३० वाजता  काही कामानिमित्त आलापल्ली ला येत असतांना आलापल्ली वरून तीन किलोमीटर अंतरावर मद्दीगुड्म येते त्यांच्या दुचाकी चे संतुलन बिघडून ते खाली पडले व त्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी मद्दीगुडम येथील स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य  उपस्थित असल्यामुळे त्यांनी लगेच स्वराज्य फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला असताच स्वराज्य फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी स्वराज्य फाऊंडेशन ची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे भरती करण्यात आले. त्यामुळे परत एकदा स्वराज्य फाउंडेशन ने एकाचे प्राण वाचविले त्यामुळे गंभीर झालेल्या वक्तींनी स्वराज्य फाऊंडेशन चे आभार मानले.

Don`t copy text!