शरद कुकुडकार
भंगाराम तळोधी प्रतिनिधी
गोंडपिपरी तालुक्यातील अडेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण पार पडली.यात पुष्पाताई येलमुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचा निवडीवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात सोडविल्या जाते.तंटामुक्त गाव समितीमुळे पोलीसांचा भार कमी झालेला आहे.दरवर्षी नव्या अध्यक्षांची निवड केली जाते.गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथे नुकतेच तमुसचा अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली.यात एकमताने पुष्पाताई येलमुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.किर्तीबाई चौधरी,आरतीबाई कुकुडकार,ललीताबाई नागापुरे,वनिताबाई सातर,लिलाबाई झाडे,विघ्याबाई चौधरी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.