Home चंद्रपूर गेल्या १५० वर्षापासून तिथे आहे भक्तिमय वातावरण…

गेल्या १५० वर्षापासून तिथे आहे भक्तिमय वातावरण…

836

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)

चंद्रपुर: शहरातील हनुमान वारकरी भजन मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर यांची 150 वर्षाची परंपरा आजही कायम स्वरुपी असून दरवर्षी प्रमाणे श्रावण शुद्ध महिन्यात हनुमानजी च्या मूर्तीची पूजा अर्चा शनिवार व रविवार या दिवशी मोठ्या भक्तिभावाने साजरी केल्या जाते. या निमित्याने मंदिरात होमहवन व रात्रभर भजन कीर्तन होत असते. यामध्ये वॉर्डातील सर्व महिला व पुरुष प्रामुख्याने उपस्थित राहून हनुमान वारकरी भजन मंडळ यांना सहकार्य करीत असतात. ही परंपरा जवळपास 150 वर्षापासून सुरू आहे असे मंदिर कमेटी यांचे कडून कळले आहे.

यावेळी अथक परिश्रम घेणारे मंडळाचे अध्यक्ष राजू खांडेकर, विनोद शेरकी भा. ज.पा.ओबीसी अध्यक्ष, अशोक नवघडे, राहुल पाल, गणेश काळे, शशिकांत नागपुरे, भोला वाकुळकर, तुळशीराम आंबटकर, नागेश देशमुख, शंकर बोरकर,महेंद्र शेरकि,कल्पना ताई निब्रड, अश्विनी निब्रड,योगिता बुटले, अनिता रागीट, सुवर्णा वाघाळे, वनिता पाल,गविका जवादे, ज्योती कुडे व सर्व वॉर्डातील पदाधिकारी, भक्तगण, उपस्थित होते..

Don`t copy text!