स्वराज्य फाउंडेशनच्या सहकार्याने  नाग सापाला मिळाले जीवनदान

711

आल्लापल्ली :- आल्लापल्ली ला लागून असलेल्या नागेपल्ली येथील रहिवासी मद्धेर्लावार सर यांच्या राहत्या घरी  अचानकपणे नाग सापाचे दर्शन घडले. सुदैवाने घरच्यांना  कुठलीच जीवितहानी झाली नाही. घरात साफ आलेले घरच्यांच्या लक्षात येताच डॉक्टर साहेबांनी स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांना ही बाब सांगीतले व स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य क्षणांचा पण विलंब नकरता सर्फ मित्र राहुल सिडाम यांना ही बाब सांगून त्यांना सोबत घेऊन आले व  डॉक्टर साहेबांच्या घरी गेले आणि तिथे असलेल्या  नाग सापाला सुरक्षितरित्याने पकडले.

अश्या प्रकारे नाग पंचमीच्या आधल्या दिवशी स्वराज्य  फाउंडेशनच्या सदस्य आणि सर्प मित्र राहुल सिडाम यांच्यामुळे नाग सापाला जीवनदान देण्यात यश आले.