माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने दुर्गापूर मध्ये अन्नधान्य किटचे वितरीत

507

चंद्रपुर: जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, त्यामुळे अनेकांच्या घरचे अन्न धान्य खराब झाले त्याच सोबत अति पावसामुळे अनेक लोकांचे कामधंदे देखील बंद झाले. दुर्गापूर परिसरातील नाल्याचे पाणी अनेकांच्या घरामध्ये शिरले. त्याची वस्तुस्थिती महिला काँग्रेस च्या पदाधिकऱ्यांनी बघितली आणि याची माहिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजय वाडेट्टीवार यांना दिली.

तेव्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन महिला काँग्रेस ला अन्न धान्य किट्स उपलब्ध करून दिल्या. आज दुर्गापूर वॉर्ड नंबर ३ व वॉर्ड नंबर ४ मध्ये गरजूंना किराणा किटस वाटप महिला काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आल्या. चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या अध्यक्षा नम्रता आचार्य- ठेमस्कर यांच्या नेतृवात या किरणा किटस वाटप करण्यात आल्या.

यावेळी जिल्हा महिला काँग्रेस च्या सिनिअर उपाध्यक्षा शितल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, सचिव सिमा धुर्वे, सेवादल महिला शहर उपाध्यक्षा मेहेक सय्यद, पूजा मानकर सरपंच दुर्गापूर, सुनंदा फाले, सुष्मा लांडगे, नंदा गावंडे, अलका आत्राम, वर्षा वाघमारे, प्रतिभा थेरे, संगीता बोरीकर, सुनंदा टोंगे ग्रामपंचायत सदस्य, सुलताना शेख
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) कमिटीचे महासचिव प्रमोद बोरीकर ,सचिन मांदाळे ग्रामपंचायत सदस्य, अनिल फाले, प्रकाश टोंगे, मुन्ना तावाडे, शुभम जुमडे यांची उपस्थिती होती.