Home गडचिरोली घोट-रेगडी रस्त्याचे नूतनीकरण सुरू आहे पण रुंदीकरणाचे काय? परिसरातील नागरिकांचा मोठा सवाल..

घोट-रेगडी रस्त्याचे नूतनीकरण सुरू आहे पण रुंदीकरणाचे काय? परिसरातील नागरिकांचा मोठा सवाल..

899

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा
चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील घोट ते रेगडी व घोट ते चामोर्शी या रस्त्याची मागील काही वर्षांपासून खूब बिकट परिस्थिती झालेली होती. घोट रेगडी या मार्गाची नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात याव्ही अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती.

सध्या या रस्त्याचे नूतनीकरण कामाला सुरुवात झाली आहे
हे काम पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. परंतु माडे आमगाव फाटा ते पोतेपल्ली, नवेगाव,निकतवाडा मूलचेरा फाटा पर्यंतचे रस्ता हे रुंदीकरनासह निर्माण करण्यात आलेला नाही.

सध्या माडेआमगाव,पुसगुडा, पोतेपल्ली,पलसपूर,कोर्सेगट्टा, चापलवाडा, नवेगाव,निकतवाडा या मार्गाचे रुंदीकरण होत नसल्याने परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत
या मार्गाची रुंदीकर व्हायालाच पाहिजे अशी सर्वत्र चर्चा आहे. चामोर्शी घोट रेगडी हा मार्ग छत्तीसगड राज्याला जुळतो व हा मार्ग राज्य मार्ग असल्याने नेहमी या मार्गावर वांहणाचे आवागमान असते. तरी राज्य मार्ग असलेला हा संपूर्ण रस्ता रुंदीकरण करण्यात याव्ही अशी मागणी होत आहे*

Don`t copy text!