प्रियांका गांधी यांच्या शुभहस्ते १५,००० विद्यार्थिनींना होणार मोफत इलेक्ट्रिक सायकलचे वाटप : शिवानी वडेट्टीवार

506

१४ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील १०,००० तर ब्रम्हपुरी तालुक्यातील ५,००० अशा एकूण १५,००० विद्यार्थिनींना आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका जी गांधी यांच्या हस्ते व माझ्या संकल्पनेतून मोफत इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.

शिक्षणासाठी कोसो मैल पायपीट करत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना यामुळे मोठा फायदा होणार आहे, त्यांचा वेळ आणि शारीरिक कष्ट देखील कमी होणार आहे.

अतिदुर्गम आणि डोंगर दऱ्याने व्यापलेल्या या जिल्ह्यात दळवळणाची साधने तशी कमीच आहे.त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींना मोठी अडचण निर्माण होत असे. हीच गोष्ट लक्षात घेत १५००० विद्यार्थिनींना मोफत इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षणापासून मुली वंचित राहू नये यासाठी मी थोडासा प्रयत्न केला आहे, येणाऱ्या काळात देखील मुलींचे शिक्षण,आरोग्य यासह विविध विधायक कार्य करत राहणार आहे.

आमच्या नेत्या प्रियंका जी गांधी यांनी देखील उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत ४०% महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला ज्याचे देशभर कौतुक केले गेले. मुलींना देखील चांगले शिक्षण मिळाले तर त्या राज्य व देशपातळीवर मोठे कार्य करू शकतात हा मला विश्वास आहे