गडचिरोली:नुकत्याच गडचिरोली येथे पार पडलेल्या जिल्हास्तर निवड चाचणी स्पर्धेत जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातील ४ जणांची ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२१ महाड (रायगड) येथे होणाऱ्या सबज्युनिअर मुली व मुलांची राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भैरवी नरेंद्र भरडकर, दिशा प्रभाकर लोनबले, देवांग दुधराम महागनकार, विराज सुरेश वैरागडे असे निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत.
हे सर्व खेळाडू जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रामधील नियमीत प्रशिक्षणार्थी असून प्रशिक्षक यशवंत कुरूडकर, पंकज मडावी, महेश निलेकार, संतोष गैनवार यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे.

यांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राठोड सर, संजय मानकर, निखील इंगळे, अक्षय कोवासे आणि सर्व बॉक्सिंग खेळाडू व पालक यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.







