येत्या ८ नोव्हेंबरला पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते “विश्वरत्न” विशेषांकाचे प्रकाशन….

584

चंद्रपुर: इंडिया दस्तक न्यूज टीव्ही तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रकाशित होणाऱ्या विश्वरत्न या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा येत्या सोमवार, दि. ८ नोव्हेंबर २०२१ ला सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय भाऊ वड्डेटीवार यांचे शुभहस्ते होणार आहे.

प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून समाज समता संघाचे केंद्रीय अध्यक्ष निवृत्त आयएएस अधिकारी मा. किशोर गजभिये साहेब उपस्थित राहतील. तर याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून कांग्रेस पार्टीचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे असतील..

प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे मुख्य संपादक मुन्ना तावाडे, उपसंपादक सुरज पि. दहागावकर, कार्यकारी संपादक इंजि. नरेंद्र डोंगरे, सहकार्यकारी संपादक सुनील डी.डोंगरे, विदर्भ ब्युरो चीफ प्रशांत शाहा, गडचिरोली जिल्हा संपादक नितेश खडसे आणि इतर प्रतिनिधीने केले आहे.