Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण 25 बेकायदा खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी… हजारो आदिवासींचा...

गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण 25 बेकायदा खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी… हजारो आदिवासींचा विराट मोर्चा धड़कला उपविभागीय कार्यालयावर…..

317

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागढ़सह संपूर्ण 25 बेकायदा खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याचा मागणीसाठी सुरजागढ़ पारंपारिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वयत्त परिषदेच्या वतीने बेमुदत ठीय्या आंदोलन सुरु कण्यात आले. या बेमुदत ठीय्या आंदोलनबाबत निवेदन देऊन आपल्या मागण्याकड़े सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय जहाल मोर्चा हजारोंच्या संख्याने काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुरजागढ़, भामरागड, वेनहारा, रोपी-बारसा, घोट, पोटेगाव, झाडाभापडा, खुटगाव, टीपागड, कोरची, पारंपारिक इलाका आणि जिल्हाभरातील हजारो ग्रामसभा सहभागी झाल्या होत्या.
सदरचा मोर्चा एटापल्ली नाक्यावारील बेमुदत ठीय्या आंदोलन स्थळापासून उपविभागीय अधिकारी कार्यलायापर्यंत काढण्यात आला.
संसाधनों की लूट नही चलेगी, ना लोकसभा ना विधानसभा…. सबसे ऊंची ग्रामसभा, बेकायदा खदानी रद्द करा, लोयड्स, गोपानी, जिंदल वापस जाओ….यासारखे विविध नारे या मोर्चामध्ये देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी मोर्चाला सामोरे येऊन निवेदन स्विकारले, सदर निवेदनामध्ये सुरजागढ़ पारंपारिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वयत्त परिषदेने म्हटले आहे की, पेसा, वनअधिकार, जैव विविधता, खाण व खनिज अधिनियम, वन संवर्धन यासारखे अधिनियम डावलून गडचिरोली जिल्ह्यात 25 खदान प्रस्तावित आणि मंजूर करण्यात आलेले आहेत. रोजगाराच्या नावावर बळजबरी खोदल्या जाणाऱ्या या खदानीमुळे भारतीय संविधानाच्या तरतूदीनवये अनुसूचित क्षेत्रात असलेल्या विशेष हक्क आणि अधिकाराचे हनन झालेले असून जिल्ह्यातील आदिवासी जनतेपुढे विस्थापन आणि पर्यावरणाचा मोठा धोका आहे.

Don`t copy text!